‘अंगारकी’च्या ध्वनिफितेचे प्रकाशन.

अविनाश मोहिते आणि आयडियल एन्टरटेनमेंटस् निर्मित, आणि चंद्रकांत दुधगावकर दिग्दर्शित अंगारकी या आगामी चित्रपटातील गीताचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. या वेळी डी.आय.डी. फेम व ए.बी.सी.डी. या चित्रपटाचा नायक धर्मेश या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होता.

या ध्वनीफितेच्या प्रकाशनाच्या वेळी निर्माते अविनाश मोहिते, संगीतकार हर्षित अभिराज सह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. बाप्पा या गीताचे शब्द गुरु ठाकूर यांचे असून हे गीत प्रसिद्ध सुफी गायक कैलाश खेर यांच्या फिल्मी करिअरमधील हे पहिलेच गणपती गीत त्यांनी गायले आहे. या गीताला हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केले असून सुरवातीचा संस्कृत मंत्र हा हर्षितने गायला आहे .

Leave a Comment