कांगारुंच्या‍ फिंचचे विक्रमी शतक

साऊथम्टन- कांगारुंचा धडकेबाज फलंदाज ऍरोन फिंचच्या विक्रमी शतकामुळे तब्बक दोनशे दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनतर विजय मिळविला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये त्याचे शतक सर्वाधिक वेगवान ठरले. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्ति‍क खेळी आहे. या विजयात धडकेबाज फलंदाज ऍरोन फिंचचा मोठा वाटा होता. त्याने ६३ चेंडुंत १५६ धावांची बरसात केली. या फिंचच्या धडाकेबाज शतकामुळे कांगारुंनी पहिला टी२० सामन्यात ३९ धावांनी इंग्लंडचा पराभव केला.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्ति‍क खेळी आहे. फिंचने विक्रमी शतक ठोकले. केवळ ४७ चेंडुंमध्ये त्याने शतक पूर्ण केले. सामन्याच्या नवव्या षटकापर्यंत तो ६५धावांपर्यंत पोहोचला होता. त्या‍नंतर दहाव्या षटकात त्याने तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर १४ व्या षटकात त्याने षटकार ठोकून शतक पूर्ण केले. दिडशतकही त्याने षटकार ठोकूनच पूर्ण केले.

फिंचच्या२ धडाकेबाज शतकाच्या‍ जोरावर ऑस्ट्रेलियाने २४८ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लं डनेही दमदार प्रत्यु्त्तर दिले. जो रुटने नाबाद ९० धावांची दमदार खेळी केली. मात्र, इंग्लंडला २०९ धावाच काढता आल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३९ धावांनी इंग्लंडचा पराभव केला.

Leave a Comment