बगदाद- इराकची राजधानी बगदाद बुधवारी बॉम्बस्फोटांनी हादरले. शहरातील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 65 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. बगदाद शहरातील वाहनतळ, बाजारपेठा आणि हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट करण्यात आले. यातील काही बॉम्बस्फोट आत्मघाती होते.या बॉम्बस्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनी घेतलेली नाही. मात्र यामागे अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.