मुले गर्भातच भाषा शिकतात

वॉशिंग्टन – भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला चक्रव्यूह कसा भेदावा आणि त्यात कसे शिरावे याची माहिती दिली होती. त्यावेळी द्रौपदीच्या पोटात अभिमन्यू होता. गर्भावस्थेतल्या अभिमन्यूला ही सगळी माहिती कळत होती. मात्र ही माहिती ऐकताना द्रौपदीला झोप आली आणि चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे हे तिने झोपेतच ऐकले म्हणजे पोटातल्या अभिमन्यूला ते माहीत झालेच नाही. महाभारताच्या युध्दात गर्भावस्थेत ऐकलेल्या माहितीच्या आधारे अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत शिरला परंतु त्याला बाहेर पडता आले नाही कारण बाहेर पडण्याची युक्ती द्रौपदीने म्हणजेच पर्यायाने पोटातल्या अभिमन्यूने ऐकली नव्हती.

महाभारतातली ही गोष्ट आपण वर्षानुवर्षे ऐकतो परंतु आपण तिची बोळवण अख्यायिका म्हणून करून टाकतो. गर्भावस्थेतल्या बालकांना आकलनशक्ती असते हे काही आपल्याला खरे वाटत नाही. काही शास्त्रज्ञांनी हे सिध्द केले आहे की गर्भावस्थेतली बालके भाषा ऐकतात ती शिकतात आणि जन्मल्यानंतर त्या शब्दांचा उच्चार करतात. ही मुले जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात हे शब्द येतात.

फिनलंडमधील युनिर्व्हसिटी ऑफ हेलसिंकी या विद्यापीठातील संशोधकांनी गरोदर मातांवर हे प्रयोग केले आहेत. गर्भवती महिलांना काही विशिष्ट शब्द सांगितले गेले. काही कल्पना सांगितल्या गेल्या आणि त्यानंतर त्या शब्दांचा आणि कल्पनांचा उच्चार केला गेला नाही. मात्र गर्भाशयातील मुलांनी ते शब्द स्वीकारले आणि बोलायला लागल्यानंतर ते शब्द उच्चारून दाखवले असे आढळले आहेे. गरोदर अवस्थेतील २९ व्या आठवड्यानंतर सांगितले गेलेले शब्द या बालकांनी चांगलेच आत्मसात केले असल्याचे विशेषतः आढळले आहे.

Leave a Comment