पुणे, -मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे असलेले चौघेही उमेदवार आम्ही एकमेकांना चांगले परिचित आहोत त्यामुळे माझ्याकडून कोणाबद्दलही कोणतीही वैयक्तिक टीका होणार नाही, अशी भूमिका संमेलनाध्यक्षपदाला उभे असणारे उमेदवार आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.
गोडबोले म्हणाले, निवडणूक कायमच वादाचा मुद्दा असतो. परंतु आमच्या चौघांचा एकमेकांना चांगला परिचय आह.े ही निवडणूक निकोप व्हावी यासाठी साहित्य क्षेत्रातील या निवडणुकीचे पावित्र्य माझ्याकडून राखले जाईल. अन्य उमेदवारही मान्यवर असून त्यांच्याशीही माझे स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे माझ्याकडून कोणावरही कोणतीही वैयक्तिक टीका होणार नाही. सर्व क्षेत्रातील अनुभवांनी समृद्ध झाल्यावर त्याचा उपयोग साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी मी संमेलनाध्यक्षपदाला उभा आहे असे सांगून ते म्हणाले, जर मी संमेलनाध्यक्ष झालो, तर संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक दिले जावे यासाठी घटनात्मक दुरुस्ती त्वरीत घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे
मराठीतील महत्वाचे ग्रथं अन्य भारतीय व परदेशी भाषांत अनुवादित होऊन सर्वत्र पोचवण्यासाठी प्रयत्न करणार, सुलभ ग्रथ वितरणासाठी सर्वंकष पद्धतीचा आराखडा करणार, व्यापक लेखक वाचक संवादासाठी उपक्रमाचा आराखडा बनविणार,विचारप्रवर्तक ग्रंथलेखनाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार, मराठी भाषा वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणार, तसेच तरुण वर्ग मराठी भाषा व साहित्यापासून दरू होत चालला आहे त्यास परत मराठीकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही गोडबोले यांनी सांगितले.