टीव्ही बरोबरच मोबाईलवर पहा ‘झी अनमोल’

मनोरंजन वाहिन्यात आघाडीवर असलेल्या झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडच्या वतीने ‘झी अनमोल’ या फ्रीटूएअर वाहिनीची सूरूवात 1 सप्टेंबरपासून होत आहे. मोबाईल आणि टीव्ही अशा दोन्ही माध्यमांमध्ये एकत्र सुरू होत असलेली ही भारतीय पहिली वाहिनी आहे. नवी दिल्ली येथे सोमवारी एका रंगारंग सोहळ्यात गायक जसराज जोशी, अभिनेत्रे क्रतिका सेंगार, अभिनेत्री सयंतानी घोष, डीआयडीफेम बिन्नी शर्मा यांच्या उपस्थितीत या वाहिनीची घोषणा करण्यात आली. ‘दिल छू जाये’ अशी टेग लाईन असलेल्या या वाहिनी विषयी बोलताना झीचे मार्हेटींग प्रमुख आकाश चावला म्हणाले, गेल्या 20 वर्षांमध्ये टेलिव्हिजनवरील लोकप्रिय बॅ्रन्ड म्हणून झी समुहाकडे बघितले जाते. दर्शकांना झीच्या लायब्ररीमधून उत्तमोत्तम शोज् पाहायची इच्छा आहे. ‘झी अनमोल’च्या माध्यमातून आम्ही हे लोकप्रिय शो पुन्हा एकदा दर्शकांच्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘मूल्यांसोबत मनोरंजन’ ह्या मार्गाचा अवलंब करत वाहिनी आपल्या दर्शकांसोबत रोचक अशा ऑनएअर स्पर्धा आयोजित करणार आहे. तसेच भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील काही निवडक अविस्मरणीय कॉन्टेन्ट दाखवण्यात येईल.

Leave a Comment