अमेरिकेत अजूनही ड्राइव्ह इन सिनेमा’ सुरू

कोलंबिया-  मुंबईमध्ये वांद्रयात असणारं एकमेव ड्राइव्ह इन थिएटर बंद पडले आहे. मात्र अशी ड्राइव्ह इन थिएटर्स अमेरिकेत अजूनही सुरू आहेत. या थिएटर्समध्ये आजही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ड्राइव्ह इन थिएटर हे अलिकडच्या काळात बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत. शॉपिंग मॉल्स आणि मल्टिप्लेक्समधील वाढत्या गर्दीमुळे ड्राइव्ह इन थिएटर’मध्ये सिनेमा पाहाणार्‍यांची संख्या रोडावली आहे. हा व्यवसाय आर्थिक समस्यांनी ग्रासला आहे. हे व्यावसाय चालू झाले, तेव्हा अमेरिकेत एकुण 1990 ड्राइव्ह इन चित्रपटगृह होते.

गेल्या दशकात बहुतांश ड्राइव्ह इन थिएटर्स बंद पडले आहेत. आता अमेरिकेत 357 ड्राइव्ह इन थिएटर्स उरली आहेत. मात्र मॅसाच्युसेट्स शहरात वेलफ्लीट ड्राइव्ह इन थिएटर’मध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. येथे कारमध्ये बसून सिनेमा पाहाण्यासाठी मोकळी जागा शोधावी लागते. रिचर्च एम. होलिंगशीड यांनी 80 वर्षापूर्वी या थिएटर पद्धतीचे पेटंट नोंदवले होते. न्यू जर्सीमध्ये पहिले ड्राइव्ह इन चित्रपटगृह तयार केले. ड्राइव्ह इन चित्रपटगृहने अमेरिकेच्या संस्कृतीवर कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे.

 

Leave a Comment