धनंजय मुंडेनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांची भेटीला घेतली. धनंजय मुंडे हे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढवत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

धनंजय मुंडे हे आपले वडिल पंडित अण्णा मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपमधून बाहेर पडले आहेत. दरम्यान, विधान सभेसाठी आपण परळी विधान सभेतून निवडणूक लढवणार असल्याचे पंकजा पालवे-मुंडे यांनी यापूर्वीचं जाहीर केले आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतून निवडून आले, तर विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे-पालवे विरूद्ध धनंजय मुंडे हा सामना होणार नाही. त्यािमुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीला महत्वा प्राप्ता झाले आहे. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी असलेले धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचे समजते.

Leave a Comment