
वॉशिंग्टन – ब्रेन टू ब्रेन कनेक्शनवॉशिंग्टन: इंटरनेच्या माध्यमातून संगणक एकमेकांना जोडले जाऊ शकतात हे आपल्याला माहित होतं. मात्र आता माणसांचा मेंदू इंटरनेटच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो आणि त्यातून एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीच्या हालचाली नियंत्रित करू शकतो, असा नवा शोध लागला आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ राजेश राव आणि त्यांच्या टीमने हा शोध लावला आहे. इलेक्ट्रिक ब्रेन रेकॉर्डिंग आणि चुंबकीय प्रभावाने हे शक्य होणार आहे. यातून एका व्यक्तीच्या मेंदूतून दुसर्याच्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत संदेश पाठवले जातात आणि त्या व्यक्तीच्या हालचाली नियंत्रित केल्या जाऊ शकतात. वॉशिंग्टनमध्ये हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत संगणकांना जोडणार्या इंटरनेटचा वापर माणसांच्या मेंदुना जोडण्यासाठी केला जाऊ शकतो.