बलात्कार प्रकरणातील आरोपीचा राष्ट्रवादीशी संबध

मुंबई: मुंबईतील महिला पत्रकार सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहम्मद चांद सत्तार याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असल्याचा आरोप भाजप कडून करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांच्या सोबत चांद सत्तारचा एक फोटो जारी केला आहे. या फोटोमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादी व्यतीत झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीची बाजू ऐकून घेण्यासाठी सचीन अहीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्याचमुळे भाजपचे प्रवक्ते उपाध्ये यांनी केलेल्या वक्तव्यायस दुजोरा मिळू शकला नाही.

दरम्यान, मुंबईतील महिला पत्रकार सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी एक आरोपी, कासिम बंगाली हा पोलिसांचा खबरी असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मुंबईतील महिला फोटोग्राफरवरील बलात्काराचा सर्वस्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. बलात्कारित तरुणीच्या मागे अवघा देश उभा ठाकला आहे.

Leave a Comment