अभिनेते ओम पुरी यांच्याविरोधात गुन्हा

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते ओम पुरी यांच्याविरोधात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्यापासून खलनायकाची भूमिका करणारे ओम पुरी हे दोन वर्षांपासून पत्नीपासून विभक्त राहत आहेत.

गुरुवारी रात्री ते सात बंगला येथे राहणार्याभ विभक्त पत्नीच्या घरी गेले. त्या वेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याच वादातून त्यांनी पत्नीला काठीने मारहाण केली. या घटनेनंतर शुक्रवारी त्यांच्या पत्नीने वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली. वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नीने पोटगीसाठी त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल केला होता. २३ ऑगस्टला या खटल्याची सुनावणी होती. त्या सुनावणीसाठी पत्नीने न्यायालयात जाऊ नये यासाठी ओम पुरी यांनी तिला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणी ज्येष्ठ सिनेअभिनेते ओम पुरी यांच्या पत्नीनीने मारहाण केल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment