अटक केल्यास अन्न,पाण्याचा त्याग- आसाराम बापू

इंदोर- अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आसाराम बापू सध्या अटकेच्या संकटात अडकले आहेत. माझ्यासोबत जबरदस्ती केली गेली तर, अन्न-पाण्याचा त्याग करील, अशी धमकी आसाराम बापूंनी दिली आहे.जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंना समन्स बजावला आहे. त्यासाठी पोलीस इंदोरला त्यांच्या आश्रमात पोहोचले आहेत.

याबाबत बोलताना आसाराम बापू म्हणाले, ‘काही जणांनी मिळून माझ्या विरोधात कट रचला आहे. जर असे काही झाले तर भक्तगण काय करतील हे सांगता येत नाही. माझ्यासोबत जबरदस्ती केली गेली तर, अन्न-पाण्याचा त्याग करील.’

एका १६ वर्षीय मुलीवर जोधपूर आश्रमात लैंगिक अत्याचार केल्याचा आसाराम बापूंवर आरोप आहे. नवी दिल्लीत या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र ही मुलगी आपल्या नातीसारखी असल्याचे आसाराम बापूंनी म्हटले आहे. दरम्यान,जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंना समन्स बजावला आहे. त्यासाठी पोलीस इंदोरला त्यांच्या आश्रमात पोहोचले आहेत. ३० ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment