परिणीती पडली शानच्या प्रेमात

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, बॉलीवूड अभिनेत्री परिणीती ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झलक दिखला जा’च्या सेटवर आली होती. यावेळी ती गायक असलेल्या शानने केलेल्या डांसच्या इतकी प्रेमात पडली की, तिने मोठ्या पडद्यावर शानसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

परिणीती ही आपल्या सिनेमाचा प्रचार करण्यासाठी या शो मध्ये आली होती. ‘ए क्या बोलती तू’ या गाण्यावर शाननं सादर केलेल्या डान्सचा आनंद परिणीतीने घेतला. “गायक तर तू आहेसच, पण आता खुप चांगला डान्स आणि चांगली अॅक्टिंगही केलीस. शुद्ध देसी रोमान्सच्या सिक्वलमध्ये मी तुझ्यासोबत रोमान्स करण्याची इच्छा असल्याचे, परिणीतीने शानच्या डांसवर कमेंट देतांना म्हटले.

‘झलक दिखला जा’च्या सेटवर टपोरीच्या वेशभूषेत असणा-या शानला या गोष्टीचा आनंद झाला. ‘मात्र हिरोचा नाही तर मला काकाचा रोल करावा लागेल’, असेही यावेळी बोलताना शान यांनी स्पष्ट केले. त्यावेळी जज म्हणजे अभिनेत्री माधुरी दिक्षीत, रेमो डिसूजा आणि करण जोहर हे देखील उपस्थित होते.

Leave a Comment