डॉ. दाभोळकर हत्या तपास प्रकरणी प्रगती पण आरोपीस अटक करण्यायेंवढी परिस्थिती नाही. ˆ- मुख्यमंत्री

पुणे, -अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत, पण त्याच्या आधारे आरोपीला पोलिसांच्या हाती लागले आहेत. पण अजून आरोपीला अटक करण्यायेवढी परिस्थिती नाही, असे राज्याचे मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. अशा केसमध्ये केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही, तर त्याचा सूत्रधार सापडणे गरजेचे आहे, त्यासाठी वीस पथके काम करत आहेत, असेही मु‘यमंत्री म्हणाले.

पुण्यातील काही कार्यक‘मानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प‘श्नांना उत्तर देताना ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि मुंबई येथे झालेली सामुहिक बलात्कार या दोन्हीही घटना गंभीर आहेत. मुंबई येथील बलात्कार प्रकरणी आज सकाळीच पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांची प्रगती आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नसली तरी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

मारेकर्‍याच्या शोधासाठी 19 पथके नियुक्त करण्यात आले आहेत. ही पथके सर्व पातळींवर तपास करत आहेत. मी सातत्याने पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आहे. पोलिसांना जी मदत लागेल. ती पुरवली जाईल. राज्यात अलीकडच्या काळात अशी गंभीर घटना घडली नव्हती. स्वतंत्र्य व्यक्तीचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. मारेकर्‍यांना शोधण्यात येईल. मात्र, त्या घटनेमागचा सूत्रधार शोधणे महत्त्वाचे आहे. आज सातारा येथे जाऊन डॉ. दाभोलकर कुटुंबियांची भेट घेणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नुकत्याच घडलेल्या दोन-तीन घटनांच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यामध्ये पोलिसांची सं‘या वाढविण्याबद्दल निर्णय घेण्यात आले आहेत. महिला पोलिसांची सं‘या कमी असल्याची टीका सातत्याने होत आहे. मात्र, राज्यात महिला पोलिसांची सं‘या मोठी आहे. मुंबईसार‘या शहरात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.

Leave a Comment