संमेलनाध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

पुणे, – सासवड येथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी फ. मु . शिंदे, लेखक संजय सोनवणी, अरुण गोडबोले आणि कवयित्री प्रभा गणोरकर या चौघां पैकी एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने संमेलनाध्यपदाची निवडणुक चौरंगी होणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

संमेलनाध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. सायंकाळी सात वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. शेवटच्या दिवशी कोणीही अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुकीसाठी चौघांची नावे निश्‍चित झाली आहेत. निवडणुक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी आज अंतिम मतदार यादी जहिर केली असून एकुण 1 हजार 69 मतदर या निवडणुकीसाठी आहेत. 4 सप्टेंबर पासून अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडुन मतदारांना मतपत्रीका पाठविण्यात येणार आहेत. मतदारांकडुन निवडवणुक अधिकार्‍याकडे 15 आ्नटोबर पर्यंत मतपत्रीका परत येणे आवश्यक आहे. 16 आ्नटोबरला मतमोजणी होईल त्यानंतर संमेलनाध्याक्षाचे नाव जाहिर करण्यात येणार आहे असे आडकर यांनी सांगीतले.

Leave a Comment