सातारा: बस दरीत कोसळून 3 ठार 38 जखमी

सातारा – एसटी महामंडळाची बस दरीत कोसळून 3 प्रवासी ठार तर 38 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील वर्धनगड घाटात आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

दहिवडी डेपोच्या दहिवडी – सातारा एसटीला हा अपघात झाला आहे. सातारा – सोलापूर राज्य मार्गावर कोरेगाव पासून 7 किलोमीटर अंतरावर वर्धनगड घाट आहे. बस याठिकाणी आली असता चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट दरीत कोसळली. यावेळी एसटी थेट पुलावरून खाली 150 फुट आदळली. जखमींना सातारा शासकीय रुग्ण्यालात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातातील 5 जण अजूनही अत्यावस्त अवस्थेत आहेत.

Leave a Comment