माझ्यामुळे सचिन निवृत्त-सईद अजमल

‘गेल्या वर्षी आशिया चषक क्रिकेट सामन्यात मी सचिनला बाद करून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीसाठी प्रवृत्त केले’, असे अजमलने ‘विस्डेन इंडिया’ला दिलेल्या ताज्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.मास्टर बलास्टार सचिन तेंडुलकरबाबत पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर सईद अजमलने टिपण्णी करून क्रिकेटरसिकांचा रोष ओढवून घेतला आहे.

ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर २०१२मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा सामना झाला होता. ४८ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारणा-या सचिनला त्या सामन्यात अजमलनेच बाद केले होते. टीम इंडियानने तो सामना सहा विकेट आणि १३ चेंडू राखून जिंकला होता. परंतु सचिनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील तो अखेरचा सामना ठरला होता.४६३ एकदिवसीय सामने खेळल्यानंतर मी बाद केल्यामुळेच त्याला एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करावा लागला, असे अजमलने विनोदाने म्हटले आहे.

अजमल म्हनाला, ‘२०११ च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील मोहालीमधील उपांत्य फेरीच्या सामन्यातसुद्धा मी सचिनचा ८५ धावांवर बळी घेतला होता. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ५० हजारांहून अधिक धावा जमा आहेत. त्यामुळेच सचिनचा बळी मिळवणे हा माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण ठरला.’