पुणे- हैदराबाद हॉटशॉटस्ने मुंबई मास्टर्सचा ३-२ने पराभव करत इंडियन बॅडमिंटन लीगच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली. सायना नेहवालने मुंबई मास्टर्सच्या पी. सी. तुलसीला बॅडमिंटनचे धडे शिकविताना २१-७, २१-१० असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

त्याआधी मुंबईच्या ली चोंग वेई याला हैदराबादच्या अजय जयरामने विजयासाठी चांगलेच झुंजविले. अनुभवी ली चोंग वेईने वेळीच स्वत:ला सावरत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. पहिला गेम हातातून निसटल्यानंतर जयरामने दुस-या गेममध्ये जबरदस्त प्रतिहल्ला चढविला अन् पाहता पाहता त्याने हा गेम २१-११ असा जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक तिस-या गेममध्ये दमछाक झालेल्या जयरामने चुकांमागून चुका केल्या. शेवटी ली चोंगने हा गेम ११-५ जिंकून मुंबई मास्टर्सला पहिला विजय मिळवून दिला. पुरुष दुहेरीच्या तिस-या लढतीत गोह व्ही शेम व वाह लीम खिम जोडीने मुंबई मास्टर्सच्या बी. सुमित रेड्डी, व मनु अत्री जोडीवर ११-२१, २१-१६, ११-९ असा विजय हैदराबाद हॉटशॉटस्ला २-१ असे आघाडीवर नेले. त्यानंतर पुरुष एकेरीच्या दुस-या लढतीत एस. तानोंग्सॅकने मुंबईच्या मार्च झ्वेईब्लेरचा २१-१९, १७-२१, ११-६ असा पराभव करत हैदराबाद हॉटशॉटस्ला ३-१ असे विजयी आघाडीवर नेले. अखेरच्या मिश्र दुहेरीच्या लढतीत मुंबईच्या व्लादिमार ईवानोव्ह व सिक्की रेड्डी जोडीने विजय मिळविला.