इंटरनेट वापरात भारताचा तिसरा क्रमांक

नवी दिल्ली- इंटरनेट युझर्सच्या बाबतीत जपानला मागे टाकत भारताने जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारतातील इंटरनेट युझर्सची संख्या सात कोटी 39 लाखवर पोहचली असून चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो.

मोबाईलवरुन इंटरनेटचा वापर करणा-यांची वाढती संख्या, स्मार्टफोनची वाढत्या मागणीमुळे इंटरनेट वापरणा-यांची संख्या वाढत आहे. जपानमधील इंटरनेट युझर्सची संख्या एक कोटी 76 लाख इतकी आहे. आशिया खंडातील इंटरनेट युझर्सचा विचार करता चीन आघाडीवर आहे.

एकूण इंटरनेट युझर्सपैकी 54 टक्के युझर्स चीनमधील आहेत. तर भारतातील युझर्सची संख्या 11.5 आणि जपानमधील 11.4 टक्के इतकी आहे.

Leave a Comment