मासे खा, निरोगी व्हा

fish वॉशिंग्टन – बर्‍याच संशोधकांनी प्रदीर्घ काळपासून निरोगी राहण्यासाठी मासे खाण्याचा सल्ला दिलेला आहे. आठवड्यातून दोन वेळा मासे खाल्ल्यास अनेक विकारांची शक्यता दूर होते, असा त्यांचा दावा आहे. ओमेगा थ्री फटी ऍसिडस्चा मुबलक पुरवठा करणारे मासे ड जीवनसत्व, झिंक, मॅग्नेशियम आणि आयर्न यांनी युक्त असतात आणि त्यांच्या खाण्याने शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो. मासे खाल्ल्यामुळे होणारे मुख्य ङ्गायदे खालीलप्रमाणे नमूद केले जातात.

१ मासे खाल्ल्याने आपल्या रक्तातील ट्रायग्लिसेराईडस् या चरबीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा बंदोबस्त होतो.
२ माशांपासून मिळणार्‍या तेलांमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया थांबते आणि हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर पडणारे हृदयाचे अनियमित ठोके नियमित होतात.

३ बहुतेक माशांच्या शरीरामध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फटी ऍसिडस् असतात, ज्यांच्यामुळे मेंदूची चांगली वाढ होते.
४ नैराश्यामुळे माणसाच्या मेंदूची होणारी झीज सेरोटोनिन या रसायनामुळे भरून निघत असते. हे सेरोटोनिन मासे खाल्ल्यामुळे वाढते.

५ काही विशिष्ट प्रकारच्या माशांमध्ये सेलेनियम हे द्रव्य असते आणि ते कर्करोगाचा प्रतिबंध करण्यास उपयुक्त ठरते.
६ मासे खाल्ल्याने शरीरातील रक्तशर्करेचा समतोल सांभाळला जातो आणि मधुमेहींना त्याचा उपयोग होतो.
७ सोरायसिस, संधीवात अशा रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे होणार्‍या विकारात मासे उपयोगी पडतात. कारण माशांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment