गोरखालँड भागात आंदोलकांचे अटकसत्र

दार्जिलिंग – पश्‍चिम बंगालमधून गोरखालँड हे नवे राज्य निर्माण करण्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चा या संघटनेतंफे सुरू असलेले आंदोलन दडपून टाकण्याच्या इराद्याने राज्य सरकारने या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केले आहे. या संघटनेचे सर्वोच्च नेते बिनय तमंग यांना काल अटक करण्यात आली. हे अटकसत्र मध्यरात्री सुरू झाले. बिनय तमंग यांच्यासोबतच अन्य पाच नेत्यांना अटकेत टाकण्यात आले.

अशा प्रकारचे अटकसत्र सुरू होणार याची चाहूल लागल्यामुळे जनमुक्ती मोर्चा संघटनेचे काही नेते भूमिगत झाले होते. त्यापैकी तमंग यांना सिक्कीम मध्ये अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. हे अटकसत्र आंदोलन दडपून टाकण्यासाठी असल्याचे लोकांची भावना आहे. पण सरकार मात्र उघडपणे तसे मान्य करत नाही. बिनय तमंग यांना झालेली अटक पूर्वीच्या काही प्रकरणात झालेली आहे असे सरकारतर्ङ्गे स्पष्ट करण्यात आले.

अटकेचे कारण काहीही असले तरी या अटकेमुळे गोरखालँड राज्य मागणीच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. ३ ऑगस्टला हे आंदोलन सुरू झाल्यापासून ५०० कार्यकर्त्यांना अटकेत टाकण्यात आले आहे. ३ ऑगस्ट रोजी या संघटनेने बेमुदत बंदचे आंदोलन जाहीर केले होते आणि तेव्हा काही लोकांना अटक झाली होती. आता आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी काही लोकांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे. बिनय तमंग यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.

Leave a Comment