दीपिका पदुकोण ठरली नंबर वन

बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफ बेबो करीना कपूर आणि चुलबुली अनुष्का शर्मा यांना मागे टाकत दीपिका पदुकोण ही साऊथ इंडियन ब्युटी नंबर वन अभिनेत्री ठरली आहे.नुसतीच नंबर वन नाही तर दीपिका ठरतेय बॉलिवूडची सेक्सिएस्ट अक्ट्रेस म्हणून ती नंबर वन अभिनेत्री ठरली आहे,असे एका सव्हेक्षनातून आढळून आले आहे.

बॉलिवूडमध्ये ‘ओम शांती ओम’मधून पदार्पण केलेल्या दीपिकाला म्हणावे तसे ग्लॅमर यापूर्वी मिळालं नाही. मात्र, कॉकटेल सिनेमाने सारे काही बदलले आणि दीपिका ठरली बॉलिवूडची सेक्सिएस्ट अक्ट्रेस. गेल्‍या काही दिवसांपासून तिचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट आहे.

‘कॉकटेल’ सिनेमापासून सुरु झालेला हा सिलसिला एवढयावरच थांबलेला नाही. तर त्यापाठोपाठ ‘रेस २’, ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमांमधून दीपिकाचं ग्लॅमर खुलून आलं आणि कतरिना, करीना, प्रियांका या बॉलिवूडच्या नंबर वन अभिनेत्रींना मागे टाकत दीपिका ठरली बॉलिवूडची सेक्सिएस्ट अक्ट्रेस. त्यामुळे दीपिकाचं फॅन्समध्येही वाढ होते आहे. असे एका सव्हेरक्षणतून आढळून आले आहे.

Leave a Comment