‘धूम-3’ .. 75 कोटींना विकले जाणार टेलिव्हिजन हक्क

काही दिवसांपूर्वी ‘धूम 3’चे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले. या पोस्टवर लिहिले होते, ‘THIS YEAR WILL END WITH A DHOOM’. विशेष म्हणजे ही धूम आत्तापासूनच सुरु झाली आहे. या सिनेमच्या सॅटेलाईट अधिकार खरेदी करण्यासाठी यशराज बॅनरचे मालक आदित्य चोप्राला आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी डील ऑफर मिळाली आहे.

आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या आणि यशराज बॅनरच्या ‘धूम 3’ या सिनेमाचे सॅटेलाइट अधिकार विकत घेण्यासाठी एका वाहिनीने 75 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. ही रक्कम आणखी वाढू शकते

‘धूम -3’ सिनेमाचा सॅटेलाइट अधिकार विकण्यासाठी आदित्य चोप्राला आतापर्यंतचा सगळ्यात जास्त पैसा मिळणार आहे. आतापर्यंत इतका पैसा कोणालाही मिळाला नसल्याची चर्चा आहे. ‘धूम 3’ सिनेमा टेलिव्हिजनवर दाखवण्याचे अधिकार विकल्यावर त्यांना 75 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

या कराराची कहाणीदेखील फिल्मी आहे. खरं तर गेल्या 15 वर्षांपासून यशराज बॅनरच्या सगळ्या चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार सोनी विकत घेत होता. आदित्यदेखील दुसर्‍या वाहिनीचा विचार करत नव्हता. मात्र यावेळेस सोनीच्या विरोधी वाहिनीने आदित्यला 75 कोटींची ऑफर दिली. आदित्यने घाई न करता त्यांना लिखित प्रस्ताव देण्यास सांगितले. लिखित प्रस्ताव आल्यानंतर आदित्यने सोनीसोबत चांगले संबंध असल्यामुळे त्यांना ते कागदपत्र सोपवले. असे करून त्याने नाते आणि बिझनेस दोन्हीही सांभाळले.

आता अधिकार सोनी घेवो की विरोधी चॅनल यशराजच्या खात्यात तर 75 कोटी रुपये येतीलच. दोन्ही वाहिन्यात स्पर्धा लागल्यामुळे हा करार 100 कोटींपर्यंत जाऊ शकतो. विरोधी चॅनल कोणते त्याच्याविषयी माहिती मिळाली नाही. मात्र ट्रेड तज्ज्ञांच्या मते, इतकी मोठी ऑफर स्टार किंवा कलर्सच देऊ शकतो.

Leave a Comment