चाळीसगावची स्वीटी पाटे विमान डिझाईन संशोधनासाठी जर्मनीला रवाना

जळगाव – नासामध्ये दोनवेळा संशोधन करुन वयाच्या 20 व्या वर्षी जगातील पहिली महिला युवा शास्त्रज्ञ म्हणून सन्मान मिळविलेली चाळीसगावची स्वीटी पाटे ही खान्देश कन्या भविष्यातील विमानांच्या डिझाईनवर संशोधन करण्यासाठी प्रशिक्षणासाठी जर्मनीला रवाना झाली आहे.

स्वीटी पाटेने नुकतीच एरोस्पेस इंजीनइरिंगची बी-टेक पदवी विशेष प्राविण्यासह संपादित केली आहे. संशोधनाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी जर्मनीच्या अंतराळ संशोधन केंद्राच्या खास निमंत्रणावरुन ती जर्मनीला रवाना झाली आहे.

आपणास अंतरात प्रवास करता येईल का? या एका प्रश्नाने झपाटलेल्या व डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मिशन -2020’ने प्रभावीत झालेल्या स्वीटीचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, अमेरिकेत भरणार्या जागतिक एरोस्पेस व मेकॅनिकल कॉन्फरन्समध्ये स्वीटीला भाषणासाठी आमंत्रीत करण्यात आले आहे.

Leave a Comment