जेस्सी रायडरवर सहा माहिन्याची बंदी

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रीडा पंचायतीने बंदी असलेले उत्तेजक पदार्थांच्या सेवनाबद्दल न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज जेस्सी रायडर याच्यावर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. ही बंदी एप्रिलपासून लागू झाली आहे. सहा महिन्याहनंतर म्ह ण्जेल ऑक्टोबरपासून रायडर पुन्हा टीम न्युझीलंड कडून खेळू शकणार आहे.

रायडरने फेब्रुवारी २०१२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मार्च २०१३ मध्ये रायडरने स्थानिक सामन्यांत खेळताना बंदी असलेले उत्तेजक द्रव्य सेवन केले होते. त्यावेळी रायडरचे रक्त व मूत्राचे नमुने घेतले होते. त्यामध्ये पीबीए आणि डीईबीईएस असे मनुष्याला ऊर्जा देणारे अंश सापडले. सामन्यांपूर्वी शक्तिवर्धक गोळ्यांचे सेवन केले असल्याचे रायडरने मान्य केले. आपले वजन वाढले होते.

वजन वाढल्यालने आपल्या क्रिकेट कारकीर्दीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत होता. म्हणूनच कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठीच आपण शक्तिवर्धक टॅब्लेट घेतल्या होत्या. उत्तेजक द्रव्य सेवन केल्याची कबुली दिल्यावरच आम्ही रायडरवर सहा महिने बंदीचा निर्णय घेतल्याचे न्यूझीलंड क्रीडा पंचायतीने स्पष्ट केले. सहा महिन्यारनंतर म्हनण्जेज ऑक्टोबरपासून रायडर पुन्हा टीम न्यु झीलंड कडून खेळू शकणार आहे.