संजय दत्तने केला पॅरोलसाठी अर्ज

पुणे- विभागीय आयुक्त कार्यालयात येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने पॅरोलसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांवर पोलिसांकडून मत मागविण्याात आले आहे त्यावनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या चार माहिन्यांधपासून तो येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

येरवडा जेलमध्ये संजय दत्त ४२ महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी दाखल झाला आहे. त्याला काही दिवसांपूर्वी ब्लडप्रेशरचा त्रास झाल्याची चर्चा पसरली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणीही केली होती. त्यामुळे संजय दत्तकडून पॅरोलसाठी अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे.

येरवडा जेलमध्ये मे महिन्यांत भरती झालेल्या संजयने पहिल्यांदाच पॅरोलसाठी अर्ज केला आहे. हा अर्ज प्राप्त झाला असून त्यावर पोलिसांचे मत मागविण्यात येणार आहे. पोलिसांचा अभिप्राय आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांकडून सांगण्यात येते.
दरम्यान, पॅरोल रजा मिळविण्यासाठी कैद्यांकडून आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या वैद्यकिय समस्येचा आधार घेतला जातो.

Leave a Comment