डॉ नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात निर्घृण हत्या

पुणे,–ˆ गेली वीस वर्षे महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी आवाज उठवणारे व जादूटोणाविरोधातील विधेयकासाठी प्रयत्न करणारे साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी सात वाजता पुण्यातील ओन्कारेश्वर पुलावर अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालून निघृण हत्त्या केली. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात शोक व संताप व्यक्त होत आहे. पुणे व सातारा शहरासह अनेक शहरात उत्फूर्त बंद पाळले जात आहेत. ठिकठिकाणी या हत्येचा निषेध करण्यासाठी मोर्चे निघत आहेत. त्यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी अनेकांनी त्यांना संपविण्याची भाषा केली होती त्यासाठी पोलीसांनीही त्यांना पोलीस संरक्षण घ्या किंवा बरोबर पिस्तुल परवाना तरी घ्या, अशी सूचना केली होती तरीही या आंदोलनात माझ्यावर हल्ला झाला तरी त्यामुळे मी जाईन पण आंदोलन पुढे जाईल, अशी त्यानी प्रतिक्रिया दिली होती.

आज सकाळी सातच्या सुमारास ते बालगंधर्व पुलावरून फिरण्यास जात असता ओंकारेश्वरचौकात सुमारे पंचवीस वयाच्या दोन तरुणांनी मोटारसायकलवर येवून त्यांना पिस्तुलने दोन गोळ्या घातल्या. त्यात एक गोळी त्यांच्या डोक्यात गेल्याने ते जागेवरच खाली पडले तेंव्हाच ते गत:प्राण झाले. ते 68 वर्षाचे होते. त्यांच्या झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणाहून शनिवारपेठ पोलीस चौकी ही एका हाकेच्या अंतरावर आहे. डॉ दाभोलकर यांच्या खिाशातील काही कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली व त्यांना त्वरीत ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्यांच्यावर उपचार सुरु करण्यापूर्वीच डॉक्टरांनी ते निधन पावले असल्याचे जाहीर केले. संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून अजून काही हातात पुरावा सापडला नसल्याचे जाहीर केले. पोलीसांनी आठ पथके तयार केली असून सर्व अंगांनी तपास सुरु केला आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या हत्येतील आरोपींची माहिती देणारास दहा लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. आज सकाळी या हत्येची बातमी शहरात व राज्यात वार्‍यासारखी पसरली. पोलिसांनी घटनास्थळाला त्वरीत घेरले व तपासाला आरंभ केला. काही वेळातच पुण्याची नाकेबंदी करण्यात आली. घटनेच्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तींच्या माहितीनुसार हल्लेखोरांच्या गाडीचा नंबर व वर्णन यांच्या आधारे सकाळी दहा वाजता दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. सकाळी सव्वा अकरा वाजता त्यांचे पार्थिव ससूनमधून अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेण्यात आले. तेथून अंत्ययात्रेच्या स्वरुपात ते लक्ष्मी रोड, बाजीराव रोड या मार्गाने साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यालाच दुपारचे अडीच वाजले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सातार्‍याला त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ व त्यासाठी राज्यशासनाने करावयाचा जादुटोणाविरोधी कायदा यासाठी त्यंानी गेले वीस वर्षे अविश्रांत परिश्रम घेतले.

अशी घडली दुर्दैवी घटना
डॉ. दाभोळकर हे मूळचे सातार्‍याचे पण साधनासाप्ताहिकाच्या कामासाठी ते सोमवार आणि मंगळवारी पुण्यात वास्तव्यास येत. काल ते मुंबईहून पुण्यात आले होते.त्याची तिकिटे त्यांच्या खिशात सापडली. पुण्यात ते प्रा. रा. ग. जाधव यांच्या निवासस्थानी मुककाम करतात. रात्री मुक्काम केल्यावर पहाटे शनिवार पेठेतील घरातून ओंकारेश्‍वर मंदिरासमोरून संभाजी उद्यानात ते फिरायला गेले होते. तिकडून परत येत असताना विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांच्या पाठीमागून दोन हल्लेखोर आले. काही अंतर पुढे जाऊन पुलाच्या कडेला असलेल्या शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ त्यांनी गाडी उभी केली. तेथून चालत दाभोळकर यांच्या जवळून मागे गेले आणि मागून अगदी जवळून त्यांच्या डो्क्यात दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर धावत जाऊन गाडीवर बसले आणि शनिवार पेठेतील गल्लीतून पसार झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. गोळ्या झाडल्यानंतर फटाके वाजल्यासारखा आवाज झाला त्यामुळे वळून पाहिले त्यावेळी एक ज्येष्ठ नागरिक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर दोनजण तेथून पळत होते. त्यांनी तातडीने गाडी काढली आणि पसार झाले, असे सांगत त्या प्रत्यक्षदर्शीने गाडीचा क्रमांकही पोलिसांना दिला आहे. त्यानुसार गाडीच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

तेथे जवळच कॉसमॉस बँक असलेल्या देवी हाईट्स या इमारतीच्या समोर उतरावर विश्रामबाग पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर त्यांच्याच समोरून पसार झाले. प्रत्यक्षदर्शीने धावत जाऊन पोलिसांना या गोळीबाराची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दाभोळकर यांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या खिशात अंनिसच्या नावाचे दोन धनादेश होते. याशिवाय त्यांचे स्वत:चे दोन फोटोही होते. त्यावरून लागलीच त्यांची ओळख पटली.

जमिनीवर पडालेला इसम दाभोळकर असल्याचे सिद्ध होताच संपूर्ण शहर पोलीस दल खडबडून जागे झाले आणि पोलीस आयुक्तांसह सगळ्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान दाभोळकर यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉकटरांनी घोषित केले, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रसाद हसबनीस यांनी दिली. दाभोळकर यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने आणखी गोळ्या झाडल्या. त्यांपैकी एक गोळी त्यांच्या छातीत गेली असून घटनास्थळी दोन गोळ्या सापडल्या आहेत, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांनी दिली. दाभोळकर यांच्या डोक्यात दोन तर छातीत एक गोळी लागली होती. त्या काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती ससूनमधील सूत्रांनी दिली.

डॉ दाभोलकर हे मूळचे सातार्‍याचे. त्यांचे कुटुंब हे सातारा जिल्ह्यातील दाभोल यागावचे म्हणून त्यांचे आडनाव दाभोलकर असे पडले. त्यांच्या दहा भावंडापैकी ते सर्वात धाकटे. पुणेविद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ देवदत्त दाभोलकर हे त्यंाचे थोरले बंधू. त्यांचे शालेय शिक्षण सातारायेथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण सांगलीच्याविलिंग्डन महाविद्यालयात व एमबीबीएस डॉक्टरीचे शिक्षण मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.

डॉ बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा ’ या चळवळीतून डॉ नरेंद्र दाभोलकरांचा संबंध पुरोगामी चळवळीशी आला. अंधश्र द्धा निर्मुलन संघटनेच्या राज्यात 150 शाखा असून त्या सार्‍या कृतीशील शाखा आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी राज्यात दहा हजार शिक्षकांचे अंधश्रद्धा निर्मुलनाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेतले आहे.या विषयावर त्यांनी अकरा पुस्तके लिहीली आहेत. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे संपादकपद त्यांच्याकडे बारा वर्षापूर्वी प्रा. ग प्र प‘धान यांच्याकडून आले. त्युळे त्यांच्या चळवळीला अधिक गती आली. पुण्यातील साधना साप्ताहिक व सानेगुरुजी विद्यालययेथील लोकांचे अंत्यदर्शन झाल्यावर त्यांचे पार्थिव सातार्‍याकडे रवाना झाले.

Leave a Comment