जॉनी लिव्हरची मुलगी करणार विनोदी रोल

आज काल प्रत्येक क्षेत्रात आपल्या आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा वारसा सुरू आहे. त्यामध्ये बॉलीवूड मागे राहिले नाही. कारण की आगामी काळात जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर ही पण विनोदी मालिकेतून वडिलप्रमाणेच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

या बाबत बोलताना जेमी म्हणाली, ‘माझ्या वडिलांमुळेच मला विनोद कळतो. वडिलांना लहानपणापासून स्टेज शो करताना पाहात आले आहे. आपणही त्यांच्यासारखेच काहीतरी करायला हवे असे सतत वाटत होते, म्हणूनच मी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या कामाच्या माध्यामातून मला आनंद मिळतो. त्यामुळे मी या कामवर खूष आहे.’

येत्या काळात सोनी चॅनेलवरील ‘कॉमेडी सर्कस के महाबली’मधून तिने विनोदी मालिकेला सुरूवात केली आहे. पदार्पणातच तिने विनोदीबुद्धीची चुणूक दाखवून दिली. या कार्यक्रमात तिच्यासोबत प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुरेश मेनन आणि मुबीन हे कलाकार आहेत. या कार्यक्रमामध्ये जेमी तीन पात्र वठवित असून, या पात्रांना तिने पूर्णपणे न्याय दिलेला आहे, असे मत परीक्षक विवेक ओबेरॉय याने व्यक्त केले.

Leave a Comment