खूनाचे गुढ उकलले;आईनेच केली मुलाची हत्या

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या आर्यन सासणे या बालकाच्या हत्येचे गूढ उकलले. पतीच्या त्रासाला कंटाळून आईनेच आर्यनचा खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आर्यनची आई ज्योती सासणेला अटक करण्यात आली असून तिनेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जिल्हातील क्रांतीसिंह नाना पाटील नगरमध्ये राहणा-या सव्वा वर्षाच्या आर्यन शिरीष सासणे या चिमुकल्याचा अपहरण करुन खून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पुईखडीजवळ १८ तारखेला दुपारी आर्यनचा मृतदेह सापडला.

यानंतर पोलिसांनी सासणे यांच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांना आर्यनच्या गळ्यातील बदाम आणि सोन्याच्या रिंगा मिळाल्या. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच ज्योतीने आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली. आर्यनचे वडील शिरीष सासणे हे दारु पिऊन ज्योतीला मारहाण करत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून ज्योतीने तो राग चिमुकल्या आर्यनवर काढला आणि त्याचा खून केल्याचे सांगितले.

Leave a Comment