नवी दिल्ली – सरकारी सेवेतील कर्मचा-यांच्या कुटूंबियांना अनुकंपा तत्वावर यापुढे नोकरी मिळणार नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला स्वत: ची पात्रता सिद्ध करावी लागेल असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
कुटूंबातीलपात्र’व्यक्तीलाच नोकरी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.एस.चौहान आणि एस.ए.बोबडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सरकारी कर्मचा-याचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबीयांची आर्थिक परिस्थिती संबंधित विभागाच्या अधिका-यांनी तपासून पहावी आणि त्यानंतरच त्याच्या कुटूंबातील पात्र उमेदवारास नोकरीची संधी देण्यात यावी असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राजस्थान उच्च न्यायालयात 2010 मध्ये एका सरकारी बँकेतील कर्मचा-याचा मृत्यू झाला. त्याच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली होती. एमजीएम ग्रामीण बँकेने राजस्थान उच्च न्यायालयाच्या या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते. त्यावर उत्तर देताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
