अखेर शरद रावांचा संप मागे

मुंबई – 22 ऑगस्ट पासून रिक्षा आणि टॅक्सीचा पुकारण्यात आलेला संप मुंबई उच्च न्यायालयाने फटकारताच मागे घेण्यात आल्याने मुंबईसह राज्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीने या बंद विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या ग्राहक पंचायतीच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने कठोर शब्दांत राव यांना फटकारले. तुमच्या मागण्यांसाठी तुम्ही वारंवार जनतेला वेठीस धरू शकत नाही. तुमचे जे काही म्हणणे असेल ते तुम्ही सरकारसमोर मांडा आणि सरकार ऐकत नसेल तर तुम्ही कधीही न्यायालयाचे दार ठोठावू शकता’, अशा शब्दात न्यायालयाने शरद रावांची कान उघडणी केली.

तसेच बंद बाबतची भूमिकाही स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे आज अखेर शरद रावांना हा रिक्षा टॅक्सीचा संप मागे घेणे भाग पडले. त्यातच शुक्रवारी ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने 22 ऑगस्ट रोजी होणार्‍या संपात सहभागी न रहण्याचा निर्णय झाला. कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्हा विभागातील सर्व रिक्षा चालक मालक यांच्या वतीने असाच घेण्यात आल्याने या संपातील हवा निघून गेली होती.

Leave a Comment