
नवी दिल्ली – भविष्यनिर्वाह निधीचे म्हणजेच पीएफ खात्याचे ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणार्या सुमारे 13 लाख पीएफ खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळे अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओने ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.