मुंबई, – आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलर अधिक मजबूत होत असल्यामुळे जगभरातील अनेक चलनांना याचा फटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉलरपुढे घसरणारा रुपया मंगळवारी सकाळी ६४ रुपयांपर्यंत घसरला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारी ऐतिहासिक नीचांक गाठला. सोमवारी सकाळी एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य थेट ६४ रुपये ११ पैसे इतके झाले आहे. परिणामी, लवकरच महागाईचा पाश आणखी घट्ट विणला जाण्याचे संकेत आहेत.
शेअर बाजारालाही रुपयाच्या घसरणीचा फटका बसला असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक २२५ अंकानी कोसळून १८ हजारच्या खाली आला आहे तर निफ्टीतही ६१.३ अंकांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलर अधिक मजबूत होत असल्यामुळे जगभरातील अनेक चलनांना याचा फटका बसला आहे. त्यातच भारतीय चलनही घसरताना दिसत आहे.
सोमवारी सकाळी शेअर कासेळल्याने काही शेअरची घसरण झाली आहे. या सर्व घटनाक्रमामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्वाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरवाढीवर झाला आहे. सोन्याचा दर ३१ हजारांवर गेला आहे.