श्रीहरीकोटा – सलग दोन वेळा अपयशी ठरलेलं जीएसएलव्ही डी-5 या प्रक्षेपकाला आणखी एक विघ्न आले आहे. अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेले जीएसएलव्ही डी-5 या प्रक्षेपकाचं आजचे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. इंधन गळतीच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जीएसएलव्ही डी-5 आज दुपारी 4 वाजून 50 मिनिटांनी अवकाशात झेपावणार होतं. मात्र आता त्यामध्ये बिघाड आल्यामुळे त्याची भरारी थांबली आहे. जर किरकोळ बिघाड असेल तर, तो दुरुस्त करून त्याचं आजच प्रक्षेपण होणार होतं. मात्र, बिघाड क्लिष्ठ असण्याची शक्यता असल्याने, श्रीहरीकोटातून जीएसएलव्ही उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
यापूर्वी हे जीएसएलव्ही डी-5 या प्रक्षेपकाचं उड्डाण दोन वेळा अपयशी ठरलं आहे. 414 टन वजनाचा आणि 49 मीटर उंचीच्या महाकाय प्रक्षेपकाच्या उड्डाणाचं काऊंटडाऊन रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरु झाले होते. जीएसएलव्हीच्या उड्डाणाचा प्रयोग इस्त्रोसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण 15 एप्रिल 2010 मध्ये भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश असलेलं जीएसएलव्हीचं उड्डाण अयशस्वी ठरलं होते.
त्यानंतर डिसेंबर 2010 मध्ये रशियाकडून मागवलेल्या क्रायोजेनिक इंजिनचा उपयोग करण्यात आला. मात्र तोही असफल ठरला. अखेर सगळ्या अडचणींवर मात करुन पुन्हा एकदा भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या मदतीनं जीएसएलव्ही डी 5 अवकाशात झेपावणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीनच्या बरोबरीनं भारतालाही मानाचे स्थान मिळेल.