रस्टनबर्ग – भारत ‘ अ ‘ संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा व सुरेश रैनाच्या१ शतकाच्या१ मदतीने भारत ‘ अ ‘ संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत ९ बाद ५८२ अशी मजल मारल्यावर डाव घोषीत केला. दुस-या दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिका ‘ अ ‘ संघाने १ बाद २० धावा केल्या.
ऑलिम्पिया पार्कच्या पाटा खेळपट्टीचा फायदा उठवत पुजारानंतर आलेल्या रोहित शर्माने तसेच सुरेश रैना यांनीही शतके झळकावून घेतली. रोहितने डावखु-या रैनाच्या साथीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागी रचली. २ षटकार , १४ चौकारांसह ११९ धावा केल्या. रैनाने ३ षटकार , १४ चौकारांसह १३५ धावा तडकावल्या. ईश्वर पांडेच्या साथीने सातव्या विकेटसाठी रैनाने ७९ धावांची भागीदारी रचली. पांडेने झटपट ३५ धावा फटकावताना २ षटकार, ३ चौकार लगावले.
जयदेव उनाडकट , शदाब नदीम या तळाच्या जोडीने ८२ धावांची नाबाद भागी करून दक्षिण आफ्रिकेला तंगवले. दुस-या दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिका ‘ अ ‘ संघाने १ बाद २० धावा केल्या. उनाडकटने हेन्ड्रिकसला यष्टिरक्षक वृध्दिमान सहाकरवी झेलबाद केले.