नवी दिल्ली – दिल्लीसामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. बालगुन्हेगारी प्रतिबंधक न्यायालय आता 31 ऑगस्टला यावर आपला निकाल देणार आहे. अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेच्या सुनावणीचा निर्णय पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे.
दिल्ली सामूहिक बलात्कार- अल्पवयीन आरोपीची सुनावणी पुन्हा पुढे
राजधानी नवी दिल्लीत 16 डिसेंबरला धावत्या बस मध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन आहे. तो दोषी ठरल्यास त्याला तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात येईल. या अल्पवयीन आरोपी विरोधातील खटल्याची सुनावणी 5 जुलै रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर 11 जुलै रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार होती.
दिल्ली बलात्काराचे गांभीर्य पाहता अल्पवयीन आरोपीलाही सर्वसामान्य आरोपीप्रमाणे शिक्षा देण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ही याचीका दाखल केली होती. या याचिकेवर 21 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यामुळे संबंधित आरोपीच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.