आसाममध्ये बॉम्बस्फोट : ५ जखमी

बरोदिशा – आसाम आणि प. बंगालच्या सीमेवरील जलपैगुडी जिल्ह्यातील बरोदिशा या गावाजवळच्या एका धाब्यावर बसमध्ये बॉम्बस्फोट होऊन पाच जण जखमी झाले. बरोदिशा हे ठिकाण जलपैगुडी जिल्ह्यातील अलीपूरद्वार या शहरापासून ३४ कि.मी. अंतरावर आणि आसामच्या सीमेच्या ४ कि.मी. अंतरावर आहे. ही बस भूतानमधील जेलेफू या गावावरून भूतानमधीलच फूटशोलिंग या गावाकडे आसाम-बंगाल मार्गे जात होती आणि ती बरोदिशा या गावाजवळच्या धाब्यावर थांबलेली होती. त्याचवेळी तिच्यात बॉम्बस्फोट झाला आणि बसचे मोठे नुकसान झाले.

स्फोट झाला तेव्हा बसमध्ये कोणीही बसलेले नव्हते. तिच्यात प्रवास करणारे २५ प्रवासी चहा-पान करण्यासाठी म्हणून बरोदिशाच्या या हॉटेलमध्ये गेलेले होते. मात्र हे प्रवासी आत असताना स्ङ्गोट झाला असता तर मोठी प्राणहानी झाली असती. चहासाठी हॉटेलमध्ये न जाता बसमधून खाली उतरून पाय मोकळे करणारे दोन प्रवासी आणि बरोदिशाच्या त्या हॉटेलमध्ये विविध वस्तूंची विक्री करणारे तीन फेरीवाले असे पाच जण या स्फोटत किरकोळ जखमी झाले.

सध्या बंगालच्या उत्तर भागात दार्जिलिंग परिसरात गोरखालँडच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्याच बरोबर आसामच्याही बोडोलँड भागात आणि कामतापूर भागात अशी दोन आंदोलने जारी आहेत. त्यामुळे या स्फोटाचा या आंदोलकांशी काही संबंध आहे की काय, अशी शंका व्यक्त करण्यात आली. मात्र नॅशनल लिबरेशन ङ्ग्रंट ऑङ्ग बेंगाली या संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ही संघटना ङ्गारशी परिचित नाही, परंतु आसामच्या दक्षिण भागात ती कार्यरत आहे. आसाममधील बोडो अतिरेकी या परिसरात नोकर्‍या करणार्‍या बंगाली लोकांवर हल्ले करतात. त्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी बंगाली लोकांची ही संघटना स्थापन झाली आहे. तिने हा स्फोट घडवला असल्याचे या स्फोटाच्या जवळ सापडलेल्या एका पत्रावरून समजले. अद्याप तरी या संबंधात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.