मुलुंड येथे नक्षलवाद्यास अटक

मुंबई – २००८मध्ये झारखंड येथील सेताविनी गावातल्या शाळेत बॉम्ब ठेवलेल्याि आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली. मुलुंड येथे एका बांधकामाच्या ठिकाणी सुतारकाम करणा-या पिंटु जवार (२३) या नक्षलवाद्यास अटक करण्यांत आली आहे.

बिहार जिल्ह्यातील गया पिंटू हा येथील रहिवासी आहे. एक संशयीत नक्षलवादी गेल्या काही दिवसांपासून मुलुंड परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि झारखंड पोलिसांनी पिंटूला मुलुंड चेकनाका परिसरातून अटक केली. २००८मध्ये झारखंड येथील सेताविनी गावातल्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मुलुंड येथे एका बांधकामाच्या ठिकाणी सुतारकाम करणा-या पिंटु जवार (२३) या नक्षलवाद्यास केली. जानेवारीत झालेल्या बॉम्बस्फोटांत सीआरपीएफचे जवान ठार झाले होते. त्या बॉम्बस्फोट प्रकरणात पिंटूचे नाव समोर आले होते.

Leave a Comment