निर्णायक अटक

लष्करे तैय्यबाचा बॉम्बगुरू म्हणवला जाणारा कट्टर दहशतवादी अब्दुल करीम तुंडा हा पोलिसांच्या जाळयात सापडला आहे. भारतातल्या बहुतेक दहशतवादी बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध असल्यामुळे त्याची अटक ही दहशतवादी कारवायांचा पुरता बिमोड करण्याच्या दृष्टीने अतीशय निर्णायक ठरणारी आहे. तो कराची ते काठमांडू या मार्गावर सतत प्रवास करत असे. याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली आणि अशाच एका चकरेमध्ये तो काठमांडूला आला असता त्याला अटक केली. शेवटी उशिराने का होईना परंतु भारतातल्या दहशतवादी कृत्यांशी सर्वकाळ संबंधित असलेला आणि या कारवायांची सर्वाधिक माहिती असलेला दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तो लष्करे तैय्यबाचा सदस्य आहे. बॉम्ब बनवण्यात वाकब्गार आहे. उत्तर प्रदेशातला गाझियाबादचा. गाझियाबादच्या पिलखुवा भागात तो राहत असे मात्र १९८५ साली मुंबईत झालेल्या हिंदु-मुस्लीम दंगलीमुळे त्याचे डोके ङ्गिरले आणि मुस्लीम समाजाला आक्रमक बनवण्यासाठी स्वतःची संघटना स्थापन केली. पुढे तो पाकिस्तानतला नामवंत अतिरेकी हाङ्गीज सईद याच्या नादी लागला आणि लष्करे तैय्यबासारख्या भारतविरोधी संघटनांच्या हातातले बाहुले बनला.

त्याला पाकिस्तानात बोलावण्यात आले तेव्हा तो सहकुटुंब तेेथे गेले आणि तिथे त्याला बॉम्ब तयार करण्याची दीक्षा मिळाली. तो दिसायला हाङ्गीज सईद सारखाच आहे. त्यामुळे त्याला पाकिस्तानातले काही दहशतवादी हाङ्गीजसाहब म्हणून ओळखतात. तुंडाचा १९९४ पासून दहशतवादी संघटनांशी निकटचा संबंध आहे आणि भारतात तेव्हापासून घडलेल्या बहुतेक बॉम्बस्फोटासाठी वापरलेली स्ङ्गोटके तुंडानीच करून दिलेली आहेत. त्यामुळे भारतातल्या तेव्हापासूनच्या जवळपास ४० बॉम्बस्फोटाचा त्याच्याशी संबंध आहे आणि म्हणूनच त्याच्या अटकेमुळे गेल्या २५ वर्षातल्या दहशतवादी कारवायांची बरीच माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हाङ्गीज सईद याने आपल्या वरील दहशतवादी कृत्यासंबंधीच्या आरोपांचा इन्कार केला. आपण अतिरेकी असल्याचा एकतरी पुरावा भारत सरकारने दाखवावा असे आव्हानच त्याने भारत सरकारला दिले. किंबहुना असा एकही पुरावा सापडणार नाही असा त्याचा दावा आहे. पण तरीही भारत सरकारने पाकिस्तान सरकारला पाठविलेल्या मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांच्या २० जणांच्या यादीत हाफीज सईदचे नाव आघाडीवर आहे आणि अब्दुल करीम तुंडा हा या यादीतला एक प्रमुख आरोपी आहे.

आता त्याच्या अटकेमुळे हाफीज सईद विषयीचे अनेक पुरावे मिळण्यास मदत होणार आहे आणि आपल्या विरुध्द एकतरी पुरावा द्यावा हे त्याचे आव्हान ङ्गोल ठरणार आहे. अब्दुल करीम तुंडाला बोलते करण्यास बराच वेळ लागणार असे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी त्याला काठमांडूत अटक केली तेव्हा तो गडबडून गेलेला नव्हता. अटक केल्याबरोबर तो पोलिसांना, कहॉं जाना है चलो, असे बेधडकपणे बोलला. अटक झाली असली तरी त्याच्या चेहर्‍यावर केलेल्या पापाचा पश्‍चात्ताप लेशभरही दिसत नव्हता. त्याला आता पोलीस कोठडी मिळाली आहे आणि त्याच्यावर ३३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे एका मागे एका प्रकरणात त्याला कोठडी मिळत जाणार आहे आणि आरोपपत्र दाखल होण्याच्या आधी निदान सहा महिने तरी पोलिसांचा पाहुणचार मिळणार आहे. तूर्तास तरी तो अजूनही मस्तीत आहे. मी ही सारी कृत्ये केली आहेत आणि अजूनही इथून बाहेर पडलो तर ती करीत राहीन असे तो बोलत आहे. अर्थात काही दिवसांनी त्याची ती भाषा बदलणारच आहे. गेल्या २ वर्षांमध्ये दहशतवादी कारवायात गुंतलेल्या अशा देशद्रोही लोकांच्या विरोधात चांगली कारवाई झालेली आहे. जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालेली आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शिक्षा भोगत आहे. अजमल कसाबला ङ्गाशी दिलेली आहे. अफझल गुरुसुध्दा ङ्गासावर लटकला आहे.

आता या तुंडाला सुध्दा लवकरात लवकरत खटला चालवून फासावर लटकावले पाहिजे. तसे झाले नाही तर दहशतवाद्यांना बळ मिळणार आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याला कायद्याचे सगळे संरक्षण मिळाले पाहिजे ही गोष्ट कोणीही नाकारणार नाही. परंतु याही उदारमतवादाचा अतिरेक होता कामा नये. तसा तो आपल्याकडे होतो म्हणूनच दहशतवादी पुन्हा पुन्हा हिंसाचार करण्यास धजावतात. अमेरिकेत तसे होत नाही. शेवटी अमेरिकासुध्दा भारतासारखेच लोकशाहीप्रधान राष्ट्र आहे. परंतु लोकशाही आहे म्हणून सद्गुण विकृतीने वागले पाहिजे असे नाही. अब्दुल करीम तुंडा याला त्याच्या घरच्या लोकांचाही विरोध आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या अटकेचे स्वागत केले आहे. त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला ताबडतोब फाशी द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी आणि घराच्या आसपास राहणार्‍या शेजार्‍यांनी सुद्धा केली आहे. तो अतिरेकी असल्याचे सर्वांना माहीत होते आणि त्याच्या नातेवाईकांना तसेच कुटुंबियांना त्याचा त्रास होत असे. आता त्याला अटक झाल्यामुळे या लोकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे आणि त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment