जीवाची मुंबई, पण मुंबईच्या परिसरात

मुंबई – मुंबई शहरातील राणीचा बाग, हँगिग गार्डन, कमला नेहरू पार्क, जुहू चौपाटी, महालक्ष्मी मंदिर, मरिन ड्राईव्ह, मलबार हिल ही सगळी सहलीची ठिकाणे मोठी आकर्षक आहेत. म्हणूनच मुंबईत आलेल्या माणसाला खूप मजा वाटते आणि मजा वाटण्याच्या या प्रवासाला जीवाची मुंबई करणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. मात्र निसर्गाचे खरे सौंदर्य मुंबई शहराच्या आसपास आहे. त्या सर्व सौंदर्य स्थळांना भेटी देणे हा एक विलक्षण आनंद असतो.

Sanjay-Gandhi

संजय गांधी नॅशनल पार्क हा बोरिवलीतला नॅशनल पार्क म्हणजे निसर्गाचे प्रतिरूपच आहे. कारण तिथे ङ्गिरताना आपल्याला मुक्तपणे विहार करणारे मोर सुद्धा बघायला मिळतात. उत्तर मुंबईतील १०४ चौरस कि.मी. क्षेत्रङ्गळाचा हा नॅशनल पार्क आणि तिथून जवळच असलेली कान्हेरी लेणी मुंबईतल्या धकाधकीचे जीवन जगणार्‍या चाकरमान्याला पर्वणी वाटल्याशिवाय राहणार नाही.

Vasai-Fort-Sebastian

कर्जत – मुंबईपासून ९१ कि.मी. अंतरावरच्या कर्जतमध्ये आजकालच्या काळात बरेच ङ्गार्म हाऊस विकसित झालेले आहेत. उल्हास व्हॅली, पेट किल्ला, भोर घाट आणि कोंडाण्याची लेणी ही कर्जतची खास पर्यटक आकर्षणे आहेत. वसई हे सुद्धा एक असेच आकर्षक. विरारकडे जाणार्‍या गाडीत बसून वसईला जाता येते. विरारच्या आधीचे तिसरे स्टेशन म्हणजे वसई. पोर्तुगीजांचा तिथला किल्ला, सेवेस्टियनचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.

Karnala

मुंबईपासून ६१ कि.मी. वर मुंबई-गोवा मुख्य मार्गावर असलेले कर्नाळा हे पक्षी अभयारण्य मनाला दिलासा देणारे आहे. या अभयारण्यात पक्ष्यांच्या १४८ जाती आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या ३८ जाती बघायला मिळतात. या ठिकाणी पर्यटन विकास महामंडळाचे रेस्ट हाऊस आहे. तिथे मुक्काम टाकून जवळपासची किल्ले आणि लेणी हीही पाहता येतात. त्याशिवाय नेरळ, सिंहगड, माथेरान, एलेङ्गंटा लेणी ही पर्यटन क्षेत्रेही मुंबईच्या आसपासची आकर्षणे आहेत.

Leave a Comment