नवी दिल्ली – कोळसा खाण उत्खननासाठी देण्यात आलेल्या परवान्यांतील भ्रष्टाचार उघडा पडून कॉंग्रेसच्या काही बड्या धेंडांचे पितळ उघडे पडणार होते, परंतु या प्रकरणाशी संबंधित ङ्गायली गहाळ करून या धेंडांना वाचवले जात आहे, असा भारतीय जनता पार्टीने केला. गहाळ झालेल्या ङ्गायलींमध्ये १९९३ ते २००५ या कालावधीत वाटप झालेल्या ४५ खाणींच्या नोंदी आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी खाणींचे वाटप करण्याबाबत काही शिङ्गारशी केल्या होत्या. त्या शिङ्गारशींची कागदपत्रे समाविष्ट असलेल्या ङ्गायलीही गायब झाल्या आहेत.
कोळसा खाण वाटपातील भ्रष्टाचार हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मानला जात आहे. परंतु केंद्र सरकारने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली. मात्र काही जागरूक नागरिकांनी या प्रकरणाचा पिच्छा पुरवला आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सरकारला चौकशी करण्यास भाग पाडले. असे होऊनही भ्रष्टाचार दडपण्याचे प्रयत्न सरकारकडून जारीच राहिले, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या भ्रष्टाचाराची चौकशी स्वत:च्या निगराणीखाली सुरू ठेवली आणि सीबीआयने आपल्या चौकशीचा अहवाल थेट न्यायालयाला सादर करावा असा आदेश दिला.
या आदेशाने भ्रष्ट कॉंग्रेस नेते अडचणीत आले. परंतु त्यांनी सत्तेचा वापर करून सीबीआयला आपला अहवालच बदलायला भाग पाडला. या प्रकरणात केंद्राच्या विधी आणि न्याय मंत्र्याला राजीनामा देणे भाग पडले. आता कोलगेट प्रकरण कोणत्याही परिस्थितीत उघड झाल्याशिवाय रहात नाही आणि आपले राजकीय स्थान धोक्यात येतेय् असे दिसताच या पुढार्यांनी या संबंधातल्या ङ्गायलीच गायब केल्या आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. ङ्गायली गायब करण्याचे हे तंत्र महाराष्ट्रातही राबविण्यात आले आहे आणि या तंत्राने अशोेक चव्हाण यांच्या आदर्श प्रकरणातील निर्णायक पुरावे नष्ट केले गेले आहेत.