आयबीएलमध्ये सायना जिंकली

लखनऊ – भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तानोंगसेक यांनी विजय मिळवला. त्यांनच्यां चांगल्याब कामगिरीनंतरही हैदराबाद हॉटशॉट्सचा इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये पराभव झाला. दिल्ली स्मॅशर्सने २-० ने मागे पडल्यानंतरसुद्धा त्यांटनी पुनरागमन करताना ३-२असा फरकाने सामना जिंकला. आयबीएलमध्ये पुणे पिस्टन्सने शनिवारी सलग दुसरा सामना जिंकला. त्यांनी मुंबईवर मात केली.

आयबीएलमध्ये पहिला सामना हैदराबाद हॉटशॉट्स आणि दिल्ली स्मॅशर्स यांच्यात रंगला. हॉटशॉट्सने विजयाने सुरुवात केली. थायलंडच्या तानोंगसेकने पहिल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात दिल्लीचा युवा खेळाडू साई प्रणीतला पराभूत केले. यानंतर महिला एकेरीत सायना नेहवाल आणि अरुंधती पानतावणे यांच्यात लढत रंगली. सायनाने हा सामना अवघ्या २८ मिनिटांत आपल्या नावे केला. आक्रमक शैलीत सुरुवात केल्यानंतर सायना विजयानंतरच थांबली.

किन कित कुन-होएंग तान यांनी पुरुष दुहेरीचा सामना जिंकून दिल्लीच्या आशा जिवंत ठेवल्या. मलेशियन जोडीने हॉटशॉट्सचे शेम गॉड आणि तरुण कोना यांना हरवले. यानंतर मलेशियाच्या डॅरेन लियूने पुरुष एकेरीचा सामना जिंकून दिल्लीला बरोबरी मिळवून दिली. लियूने माजी ऑलिम्पिक चॅम्पियन इंडोनेशियाच्या तौफिक हिदायतला हरवले. तौफिक या सामन्यात मुळीच फॉर्मात नव्हता. त्याचा आणि लियूचा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला.

आयबीएलमध्ये पुणे पिस्टन्सने शनिवारी सलग दुसरा सामना जिंकला. या संघाने सामन्यात सुनील गावसकरच्या मुंबई मास्टर्सचा ३-२ने पराभव केला. अश्विनी पोनप्पा व जोकिम फिशन निल्सनने लढतीत प्रणव चोपडा व सिकी रेड्डीचा पराभव केला. तत्पूर्वी, एनगुएन टिन मिन्हने पुरुष एकेरीत मुंबईच्या मार्क ज्वीबरला पराभूत केले. पुरुष दुहेरीत मुंबईच्या प्रणव चोप्रा व व्लादिमीर इवानोवने पुण्याच्या थॉमस सनावे व रूपेशकुमारला पराभूत केले. पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत व्लादिमीरने पुण्याच्या सौरभ वर्माला पराभूत केले. महिला एकेरीत पुणे पिस्टन्सच्या ज्युलियन शेंकने मुंबईच्या ब्राऊनला पराभूत केले.

Leave a Comment