नरेंद्र मोदी देणार भाजपच्या पदाधिका-यांना धडे

नवी दिल्ली: देशातील भाजपच्या पदाधिका-यांना आता भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे धडे देणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत, दिल्लीत भाजपच्या देशव्यापी पदाधिका-यांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीसुद्धा उपस्थित राहणार असल्या चे समजते.

रविवारी होत असलेल्या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.ही बैठक दिवसभर चालणार आहे. या बैठकीत मोदी निवडणुकीसाठी बनवण्यात आलेल्या विविध समित्यांचाही आढावा घेणार आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आतापर्यंत बैठकांपासून स्वतःला दूर ठेवत आहेत. काल झालेल्या पक्षाच्या प्रवक्त्यांच्या बैठकीतला अडवणींनी दांडी मारली होती. पण आजच्या बैठकीत मात्र त्यांनी हजेरी लावली आहे.

Leave a Comment