शाहिद कपूर करणार टक्कल

बॉलीवूडमध्ये नेहमीच क्यूट आणि लविंग ब्यॉयच्या रोलमध्ये दिसणारा शाहिद कपूर आता वेगळया रोलमध्ये‍ दिसणार आहे. आगामी काळात येत असलेल्या सिनेमात अभिनेता शाहिद कपूर शेक्सपियरचा महान ट्रैजेडी ‘हैमलेट’ या सिनेमातील लॉरेंस ऑलिवियराचा रोल करीत आहे. त्या रोलसाठी शाहिद कपूरला टक्कल करावे लागणार आहे.

आगामी काळात सिनेनिर्माता विशाल भारद्वाज शेक्सपियरचा महान ट्रैजेडी ड्रामा ‘हैमलेट’ या सिनेमावर आधारित सिनेमा तयार करणार आहेत. त्यामुळे या सिनेमात रोल करीत असताना शाहिद कपूर लॉरेंस सारखी हेयरस्टाइल करण्याचा विचार करीत आहे.

सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार ही भूमीका मनापासून करण्याचा विचार अभिनेता शाहिद कपूर करीत आहे. या सिनेमात त्याला लॉरेंस सारखा दिसण्याचा विचार करीत आहे. लॉरेंस ऑलिवरला या सिनेमातील भुमिकेसाठी ऑस्कर अवार्ड मिळाला होता. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. विशाल भरद्वाच्या ‘कमीने’ सिनेमातून शाहिदने सिनेइंडस्ट्रीला अक्शन हीरो म्हणून नवीन ओळख दिली. शाहिद हैमलेटसाठी टक्कल करणार की नाही याला मात्र दुजोरा मिळू शकला नाही.

Leave a Comment