राहुलपेक्षा मोदी बरे – लालूंच्या मेव्हण्यांचा विश्‍वास

पाटणा – राहुल गांधी यांच्यापेक्षा नरेन्द्र मोदी यांच्या हातात देश अधिक सुरक्षित राहील असा विश्‍वास राजद नेते लालूप्रसाद यादव यांचे मेव्हणे साधू यादव यांनी व्यक्त केला आहे. साधू यादव यांनी काल गांधीनगरला जाऊन नरेन्द्र मोेदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मोदी यांच्या चिंतनात आधी आपल्या देशाच्या प्रश्‍नांना प्राधान्य असते असे आपल्याला दिसून आले असे साधू यादव यांनी प्रतिपादन केले.

आपल्यालाही देशाचा विचार आधी करणे आवडते आणि मोदी यांचेही तेच धोरण असते. सारा देश आता मोदी यांच्याकडे मोठ्या आशेने पहात आहे असे यादव यांनी प्रतिपादन केले. राहुल गांधी जर सक्षम नेते असते तर त्यांनी आधी देशाची चिंता केली असती पण ते चिंताही व्यक्त करीत नाहीत आणि देशाविषयी बोलतही नाहीत. नरेन्द्र मोदी हे देशाविषयी बोलतात म्हणून आम्ही मोदीविषयी बोलतो असे ते यादव म्हणाले.

कॉंग्रेस पक्ष देशाविषयी आणि देशाच्या संरक्षणाविषयी काही बोलत नाही. अशी यादव यांनी टीका केली आहे. म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येण्याची शक्यता आहे. पण तरीही यादव यांचा कॉंग्रेसवर टीकेचा भडिमार सुरू आहे. कॉंग्रेसच्या मनात असो की नसो पण भारतीय जनतेच्या मनात नरेन्द्र मोदी हेे पंतप्रधान व्हावेत असे आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले. साधू यादव हे लालूप्रसाद यांचे मेव्हणे आहेत आणि त्यांनी मागेच राजद पक्षातून बाहेर पडून कॉंग्रेसशी घरोबा केला होता. त्यांना कॉंग्रेसने राज्यसभा सदस्यही केले होते.

Leave a Comment