मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यपदाच्या रिंगणात चार जण

पुणे, – पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सासवड येथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी फ .मु . शिंदे, लेखक संजय सोनवणी, अरुण गोडबोले आणि कवयित्री प्रभा गणोरकर या चौघांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती शनिवारी निवडणुक निर्णय अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी दिली.

अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी कोणीही अर्ज भरलेला नसल्यामुळे निवड्णुकीसाठी चौेघांची नावे निश्‍चित झाली आहेत. फ.मु.शिंदे यांनी महारष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद या दोन ठिकाणाहून अर्ज भरले होते तर प्रभा गणोरकरांनी विदर्भ साहित्य संघ, नागपुर, मसाप पुणे आणि साहित्य संघ मुंबई या घटक संस्थामध्ये अर्ज दाखल केले होते. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेने महामंडळाकडे संजय सोणवणी आणि अरूण गोडबोले यांचेच अर्ज पाठविले. शिंदे आणि गणोरकर यांचे इतर ठिकाणाहुन आलेले अर्ज निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी स्वीकारले. दरम्यान, 24 आगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार असून, यानंतर संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment