आयबीएलमध्ये आज मुंबई-पुणे लढत

लखनौ – इंडियन बॅडमिंटन लीगच्या दुस-या लढतीत शनिवारी मुंबई मास्टर्ससमोर पुणे पिस्टन्सचे आव्हान आहे. दोन्हीप संघा दरम्यान एक चुरशीची लढत अपेक्षित आहे. आयपीएलप्रमाणे आयबीएलमध्येही मुंबई विरुद्ध पुणे आमनेसामने असल्याने या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. शनिवारी होणा-या पहिल्या लढतीत हैदराबाद हॉटशॉट्सची गाठ क्रिश दिल्ली स्मॅशर्सशी पडेल. शनिवारच्या लढतीत ‘आयकॉन’ वजा कर्णधार ली चोंग वी खेळण्याची शक्यता असल्याने मुंबई संघ अधिक मजबूत झाला आहे.

मुंबईने शुक्रवारच्या सामन्यात विजयी सलामी दिली. ‘आयकॉन’ ली चोंग वी विना खेळावे लागले तरी चुरशीच्या लढतीत बांगा बीट्सवर ३-२ अशी मात केली. पुण्यानेही आश्वासक सुरुवात करताना पहिल्या लढतीत हैदराबाद हॉटशॉट्सना हरवले. विजयी सलामीमुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे. परिणामी आणखी एक चुरशीची लढत अपेक्षित आहे. शनिवारच्या लढतीत ‘आयकॉन’ वजा कर्णधार ली चोंग वी खेळण्याची शक्यता असल्याने मुंबई संघ अधिक मजबूत झाला आहे. सलामीला बांगा बीट्सविरुद्ध व्लादिमीर इव्हानोवने पुरुष एकेरीसह मिश्र दुहेरीत कामगिरी उंचावताना विजयात मोलाचे योगदान दिले. ली चोंग खेळल्यास मुंबई संघात थोडा बदल केला जाईल.

आगामी काळात सातत्य राखण्यास पुणे उत्सुक
क्रिश दिल्ली स्मॅशर्सना हरवत पुणे पिस्टनने आशा उंचावल्यात. अश्विनी पोनप्पाच्या नेतृत्वाखालील संघात महिला एकेरीत जर्मनीची ज्युलियन शेंक, पुरुष एकेरीत व्हिएतनामचा टिएन मिन्ह एन्ग्युएन तसेच भारताचे अनुप श्रीधर आणि सौरभ वर्मासारखे गुणवान बॅडमिंटनपटू आहेत.

हैदराबादला शनिवारी आणखी एका विजयाची संधी आहे. जागतिक क्रमवारी (महिला) तिस-या स्थानी असलेली ‘आयकॉन’ वजा कर्णधार सायना नेहवालवर हैदराबादची सर्वाधिक भिस्त आहे. माजी जागतिक आणि ऑलिंपिक ‘चँपियन’ इंडोनेशियाचा तौफिक हिदायत, भारताचा अजय जयरामवर त्यांची पुरुष एकेरीची मदार आहे. मिश्र दुहेरीत व्ही. शेम गो आणि खिम वा लिमवर पुरुष दुहेरी तसेच तरुण कोना आणि प्रज्ञा गद्रेवर मिश्र दुहेरीचे भवितव्य आहे.

Leave a Comment