झारग्राम – प. बंगालच्या झारग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेड्यात जमावाने एका माओवाद्याची ठेचून हत्या केली. हेमंत महातो असे त्याचे नाव होते आणि तो पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलीस ऍट्रॉसिटीज या संघटनेचा कार्यकर्ता होता. ही घटना नेडाबाहारा या गावात घडली. या गावात काल झारखंंड मुक्ती मोर्चाच्या ग्रामपंचायत सदस्याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्या अटकेच्या निषेधार्थ एक सभा आयोेजित करण्यात आली होती. तिथे हा हेमंत महातो गेला होता.
प. बंगालात माओवाद्याची जमावाकडून हत्या
महातो हा अवघा २० वर्षांचा आहे पण तो या सभेत हिंसाचार घडवण्यासाठी आला असावा असा संशय लोकांना आला. सभेला आलेल्या काही लोकांनी त्याला याबाबत हटकले असता त्याने लोकांशी हुज्जत घातली. बाचाबाची सुरू झाली आणि तिचे रूपांतर मारामारीत होऊन लोकांनी त्याला एवढे मारले की त्या मारहाणीत त्याचा जीव गेला. ही माहिती पोलीस अधीक्षक भारती घोष यांनी दिली.
ज्याच्या अटकेच्या निषेधार्थ ही सभा होती ता झारखंड मुक्ति मोर्चाचा ग्राम पंचायत सदस्य सुकुमार मुरमू याला बेकायदा स्ङ्गोटके बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याच्या घरात भूसुरूंगाची दारू सापडली होती. या मारामारीत ठार झालेला महातो हा नक्षलवादी कम माओवादी हेमंत महातो हा कट्टर अतिरेकी मानला जात होता. त्याच्या विरोधात पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केलेले होते.