मानसिक धक्क्याने बुध्यांकात घट

वॉशिंग्टन :- किशोरवयीन मुला-मुलींमध्ये शाळेत मारामार्‍या होतात, त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मुले म्हटल्यानंतर भांडणे होणारच, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मारामारीमध्ये होणार्‍या जखमा आणि मानसिक धक्का यामुळे मुलांचा बुध्यांक कमी होतो असे अमेरिकेतल्या काही संशोधकांना आढळले आहे. दोन मारामार्‍या आणि दोन जखमा या मुलाच्या बुध्यांकाची एवढी घट करतात की त्यांची तुलना एक वर्ष वाया गेल्यामुळे होणार्‍या नुकसानीशी करावी लागते. मुलींच्या बाबतीत वेगळे निष्कर्ष निघाले आहेत आणि या संबंधात किशोरवयीन मुले मुलांपेक्षा नाजूक असतात असे दिसून आले आहे.

अमेरिकेतील काही मुलांमध्ये अभ्यास कच्चा असण्याचा दोष आढळून आला. त्याचबरोबर काही मुलांचा बुध्यांक कोवळ्या वयात चांगला असतो पण नंतर तो कमी होतो असे दिसून आले. त्यामुळे त्याची कारणे शोधली जायला लागली आणि ती शाळेतल्या मारामार्‍यांमध्ये असल्याचे दिसून आले. शाळेतली मुले मारामारी करतात तेव्हा त्यांना जखमा होतात. एखादी मारामारी एवढ्या पातळीला जाते तेव्हा तिचा मुलांच्या मनावर चांगलाच गंभीर परिणाम होतो आणि त्याचा अभ्यास कच्चा राहतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment