चेन्नई एक्स्प्रेसचा दीडशे कोटींचा धंदा

मुंबई – शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटाने कालपर्यंत १५० कोटी रुपयांचा व्यवसाय करून हिंदी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम नोंदवला आहे. हिंदी चित्रपट सृष्टी एखादा चित्रपट रिलीज झाला की तो पहिल्या आठवड्यात किती धंदा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. एक था टायगर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा धंदा केला होता परंतु चेन्नई एक्स्प्रेसने पहिल्या तीनच दिवसात ही मर्यादा ओलांडली आणि आठवडा संपेपर्यंत १५० कोटी रुपये कमावले.

अशा प्रकारे आजपर्यंतच्या हिंदी चित्रपटांमध्ये चेन्नई एक्स्प्रेस हा विक्रमी गल्ला जमवणारा चित्रपट ठरला आहे. त्याचे पहिल्या तीन दिवसाचे कलेक्शन पूर्वी जाहीर झालेलेच आहे. चौथ्या दिवसापासून या चित्रपटाने सोमवारी १२ कोटी ६२ लाख, मंगळवारी ११ कोटी ५० लाख, बुधवारी १२ कोटी ५६ लाख आणि गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी विक्रमी १९ कोटी ६० लाख रुपये असे कलेक्शन करून दाखवले. आठवड्यात त्याचा गल्ला नेमकेपणाने सांगायचे तर १५६ कोटी ७० लाख झाला आहे.

Leave a Comment